Breaking News

1/breakingnews/recent

'नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनतं का'? - शिवराय कुळकर्णी

No comments



मुंबई -

महाराष्ट्राच्या मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.  तसेच यशोमती ठाकूर यांच्यापुढे काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. या टीकेला भाजपाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले. नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनतं का? सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपणार आहे का? आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलते का? गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या साऱ्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात आणि प्रश्नांची उत्तरं द्यावीत असे शिवराय कुळकर्णी म्हणाली.

शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि प्रियांका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरी हिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये. जो पक्ष एका घराण्याच्या गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकला आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतःचेच तोंड स्वतःच्याच थुंकीने मलीन करण्याचा हा प्रकार आहे”, असा टोला त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *