26 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी
या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.
2. मॉडर्ना करोना लस घेतलेल्या डॉक्टरला अॅलर्जी
बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांनी मॉडर्नाची करोना लस देण्यात आली होती.
3. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत – नरेंद्र मोदी
तसंच हे लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुषमान भारत योजना लाँच केल्यानंतर ते बोलत होते.
4. मध्य प्रदेश कॅबिनेटनं मंजूर केलं नवं विधेयक
यामध्ये अल्पवयीन व दलितांच्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद आहे. तर, विधानसभेत भाजपाचे बहुमत असल्याने सहज हे विधेयक मंजूर होऊ शकतं.
5. एकनाथ खडसेंनी अखेर सोडलं मौन
लोकांना असं वाटत आहे की हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे. वारंवार चौकशी करणं, हे लोकांना फारसं पटलेलं नाही, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
6. शोपियानमध्ये जोरदार चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
येथील कनिगाम या गावात दहशतवादी दडून बसलेले असल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांकडून परिसरास वेढा देण्यात आला व शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. त्यानंतर जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने चकमक सुरू झाली.
7. “नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी ‘महात्मा’ होतं का?”
नकली गांधी आडनाव लावल्याने कोणी महात्मा होतं का? असा सवाल करत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
8. अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची माफी
मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अॅमेझॉन बॅकफूटवर गेलं आहे. अॅमेझॉनने आपल्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यासोबतच अॅमेझॉनकडून राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याचा दावाही अखिल चित्रे यांनी केला आहे.
9. हाबळेश्वरमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी; मोडला उच्चांक
सध्या एकत्रित ग्रुप व खासगी मोटारीतून मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत आहेत. येथे आता थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीसोबतच येथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे.
10. रात्रीच्या संचारबंदीत पोलिसांकडून अंशत: बदल
पुणे शहरासह जिल्ह्यात आता रात्री संचारबंदी नसेल तर जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ReplyForward |
No comments
Post a Comment