Breaking News

1/breakingnews/recent

'कंगनाचे ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का'?- आशिष शेलार

No comments



मुंबई -

ऐडीने संजय राऊत यांना पाठवलेली नोटीस त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शेलार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कंगना रणौतचे ऑफिस बुलडोझरने पाडणे, तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही या घोषणा देणं हा मर्दपणा होता का? कुणाच्या बायका मुलांना ईडीची नोटीस आली  तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगनाविरोधात जी कारवाई केली तो मर्दपणा होता का? कंगनाविरोधात जो आकांडतांडव केला तो मर्दपणा होता का? असे प्रश्न विचारत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेवर कडाडून टीका केली आहे.  ईडीच्या एका नोटिशीमुळे संजय राऊत चांगलेच हादरले आहेत. त्यांनी दमबाजी करु नये. भाजपा दमबाजीला भित नाही असंही शेलार यांनी म्हटले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *