28 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - संजय राऊताचा पुन्हा कंगनाशी पंगा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. चालक नसणाऱ्या देशातील पहिल्या मेट्रोला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.
4. स्मृती इराणींचा घणाघात
5. 'व्हॅक्सिन पासपोर्ट' आणि 'हेल्थ पास'यापुढे अनिवार्य
8. दिवाकर रावतेंमुळे एसटी महामंडळ तोट्यात : इंटक
9. ए. आर. रेहमान यांना मातृशोक; करीमा बेगम यांचे निधन
2. शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या
: शेतकरी आंदोलनात टिकरी सीमेजवळ पंजाबमधील एका वकिलाने आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ ञासाठी आपण बलिदान देत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असेही चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
3. कृषी कायद्यांवर खुली चर्चा करा-केजरीवाल
केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांना संबोधित केले. यापूर्वीही एकदा त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला होता.
देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या स्थानिक आणि पंचायत निवडणुकांच्या निकालांबाबत माहिती देण्यासाठी भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. इराणी यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
या काळातील 'न्यू नॉर्मल'मध्ये मोबाईल ऍप्लिकेशनवर आधारीत व्हॅक्सिन पासपोर्ट आणि कोरोना निगेटिव्ह असल्याचे डिजीटल पुरावे अनिवार्य असू शकतात.
6. शिवसैनिकांची ईडी कार्यालयासमोर बॅनरबाजी
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेनालढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
7. काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी
काँग्रेसच्या १३५ वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांंनी पक्षाच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सोमवारी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली. प्रेम नसले तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना एसटी महामंडळाला केवळ पाचशे कोटींचा तोटा होता. शिवसेनेचे तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हा तोटा साडेपाच हजार कोटींवर गेला. रावतेंनी एसटी महामंडळात खासगीकरणाचे फॅड आणले, असा आरोप इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी यांनी केला.
भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचं नाव असणाऱ्या ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
10. विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
भारताचा कर्णधार विराट कोहलीची सोमवारी आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. त्यामुळे विराटने 'सर गारफिल्ड सोबर्स' या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके केली असून यापैकी ६६ शतके त्याने मागील दशकात झळकावली आहेत.
No comments
Post a Comment