Breaking News

1/breakingnews/recent

अ‍ॅमेझॉन नंतर आता डॉमिनोज मनसेच्या रडारवर

No comments




मुंबई -

मनसेनं आपला मोर्चा आता अ‍ॅमेझॉननंतर डॉमिनोजकडे वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेन केली आहे. मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनने शरणागती पत्कारत सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याच आश्वासन दिले होते.

हा सर्वप्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचे चित्र दिसत आहे. अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेने अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. सुरुवातीला मनसेने पत्र इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *