Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींचं लक्षवेधी वक्तव्य

No comments



मुंबई -

कोरोना परिस्तिथीबाबत त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्षवेधी वक्तव्य साधारण वर्षभरापासून देशात आणि संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्र प्रतिबंधात्मक लसींच्या संशोधनाच व्यग्र आहे. असे असतानाच भारतही यात मागे नाही. किंबहुना देशात लसीकरणाला आता काही दिवासंमध्ये सुरुवात होणार असल्याच चित्र आहे.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशातील कोरोना परिस्थितीबाबत वक्तव्य करत लसीकरणाची बहुतांश प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आल्याची मोठी माहिती दिली. देशातील जनतेला भारतात निर्मिती झालेल्या लसीची मात्र देण्यात येणार असल्यांचही त्यांनी सांगितले. केंद्राने नियुक्त केलेल्या काही तज्ज्ञांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासंबंधीच्या निवेदनांचा आढावा घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच गुरुवारी पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले.

गुजरातमधील शिलान्यास कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना संबोधतेवेळी त्यांनी हे वक्तव्य केले. देशात नव्यानं कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे, असंही ते यावेळी म्हणाले. पण, दुसरीकडेच ते नागरिकांना सतर्क करण्यास विसरले नाहीत. लसीकरणानंतरही कोरोनाच्या बाबतीत घेतली जाणारी काळजी आणि पाळले जाणारे नियम हे सातत्याने टीकून राहिले पाहिजेत यासाठी ते आग्रही दिसले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *