Breaking News

1/breakingnews/recent

सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव लोकशाहीला घातक - हसन मुश्रीफ

No comments




मुंबई -

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशी आदर्श मागणी होत आहे पण, सरपंचपदासाठी कोट्यवधींचे लिलाव होत आहे. या पद्धतीवर राज्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या ग्रामपंचायती जाहीर लिलाव करून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असतील तर त्याबाबत निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.

ही पद्धत लोकशाहीला घातक अत्यंत घातक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या 30 नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यात सर्व्हर जाम झाल्यानं जात पडताळणी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *