जिल्ह्याची खबरबात - बिडी पित नसल्यानं ईडीची भीती वाटत नाही; आठवलेंचा राऊतांना टोला
News24सह्याद्री - बिडी पित नसल्यानं ईडीची भीती वाटत नाही; आठवलेंचा राऊतांना टोला...पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. तीन वर्षे आश्वासने आणि चर्चा झाल्या ,आता ठोस निर्णय घ्या : अण्णा हजारे
राज्यातून पाठविण्यात आलेल्या शिफारशींमध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून कशी कपात केली जाते, याची उदाहरणे त्यांनी नमूद केली आहेत. यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरून आता यावर फक्त आश्वासन नको, ठोस निर्णय झाला नाही, तर आपण उपोषण करणार व या निर्णयावर आपण ठाम असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.
2. बिडी पित नसल्यानं ईडीची भीती वाटत नाही; आठवलेंचा राऊतांना टोला
आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्या इडीची भीती वाटत नाही, अशी मिश्कील टिपण्णीही आठवले यांनी केली. ते आज शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
3. शिर्डीत ऑनलाइन दर्शन हाऊसफुल्ल, 'ऑफलाइन' गर्दी!
मंदीर परिसरातून ऑफलाइन पास मिळविण्यासाठी करोनाची भीती सारून गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष दर्शन नाही मिळाले तरी चालेल, पण खूप महिन्यांनी शिर्डीत पाय ठेवून यायचे, या अपेक्षेनेही अनेक भाविकांनी हजेरी लावली आहे.
4. महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या खूनाचा प्रयत्न तेही पोलिस ठाण्यातच
सर्व्हर डाऊन असल्याने फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब झाला , याचा राग आल्याने फिर्याद दाखल करण्यास आलेल्या पाच जणांनी उपस्थित महिला पोलिसांशी दमदाटी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला , तर
या प्रकरणी पोलीस कर्मचारी भिमाबाई रेपाळे यांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
5. दागिने चोरांची टोळी जेरबंद
दागिने चोरीबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने राजूर पोलिसांचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते , दरम्यान पोलिसांना या सराईत गुन्हेगारांबाबत अचूक माहिती मिळाल्याने पोलिसांनी हि कारवाई करत आरोपीना जेरबंद केले .
6. पाचपुते जगताप समर्थक भिडणार आमने सामने
श्रीगोंदा तालुक्यातील निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते आणि माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक समोरासमोर भिडणार आहेत, त्यामुळे येळपणेचा निवडणूक आखाडा चांगलाच रंगण्याची शक्यता आहे ,तर
येळपणे
ग्रामपंचायतीत पाच प्रभागांमध्ये 13 जागा आहेत .व पाच हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
7. घराला आग लागून मोठे नुकसान
शिंदे यांच्या घरात कोणीत नसल्याने जीवित हानी टळली मात्र रोख रक्कम व घरातील साहित्य जळाल्याने शिंदे यांचे मोठे नुकसान झाले .
8. अकोलेतील अनेकांना लाखोंचा गंडा
पैसे द्या नोकरी घ्या अश्या प्रकारची प्रलोभने देऊन अकोल्यात अनेकांची फसवणूक झाल्याने पीडित नागरिक संताप व्यक्त करताहेत . तर फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित करावी करण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे .
9. दत्त जयंतीनिमित्त
श्री क्षेत्र देवगड मंदिर परिसरात विद्युत रोषणाई
तर २९ डिसेम्बर रोजी दत्त जयंतीचा सोहळा देवगड येथे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारे , मात्र सर्व भाविक भक्तांना दत्त जयंती सोहळा पाहता यावा यासाठी सोहळ्याचे थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे .
10. टाकळीभान येथील नागरिकांना भेडसावतोय पाणी प्रश्न
या प्रश्नासंदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासन पाणी प्रश्न निकाली काढत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मयूर पटारे यांनी स्वखर्चाने पाणी पुरवठा करत नागरिकाना काही प्रमाणात दिलासा दिला आहे .
No comments
Post a Comment