शहराची खबरबात - शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिक हैराण
News24सह्याद्री - शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिक हैराण...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. महापालिकेच्या स्थायी समितीची पहिली सभा सोमवारी पार पडणार
सभेसमोर अठरा विषय ठेवण्यात आले त्यात प्रामुख्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे सभेतील या मुख्य विषयांवर चर्चा रंगणार असून bs6 जनरेशनची वाहने खरेदी केली जाणार आहेत
2. शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिक हैराण
ड्रेनेज लाईन उघड्यावर असल्याने त्यातील किडे अक्षरशः घरात येतात ते हातांनी उचलून बाहेर फेकावे लागत असल्याने येथील नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे
3. उद्योजक लॉरेन्स स्वामी याच्या विरुद्धच्या मोक्याचा प्रस्ताव मंजूर
तर लॉरेन स्वामी याच्यावर राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल होत असून आमच्या कुटुंबावरही खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी
लॉरेन
स्वामी यांच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे
4. चंद्रकांत दादा म्हणजे बिन बुडाचे नेतृत्व -
विजय वडेट्टीवार
चंद्रकांत दादा म्हणजे बिन बुडाचे नेतृत्व असून त्यान्ना आता महाराष्ट्रात कुठेच थारा मिळणार नाही अशी टीका काँग्रेस चे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलतांना केली आहे तसेच भाजपावरही कठोर शब्दात मोठे आरोप केले आहेत
5. रेखा जरे हत्याकांड प्रकरणी नगर जिल्हा गप्प का ? - अॅड.लगड
मात्र सहावा आरोपी बाळ बोठे हा सदर गुन्हयात मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एका महिलेचा खून होतो,त्याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही, अशी खंत प्रसिध्द विधिज्ञ अॅड. सुरेश लगड यांनी व्यक्त केली असून याबाबत जिल्हा शांत का, असा सर्वांना अंतर्मुख करणारा सवालही अॅड. लगड यांनी उपस्थित केलाय.
No comments
Post a Comment