शेतकरी जागर मंचचे १ जानेवारीला धरणे आंदोलन
१ जानेवारीला शेतकरी जागर मंचचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान त्यामूळ हे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी जागर मंचाने मागील ६० दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील १०५ गांवामध्ये "मेरा गांव मेरी संसद" या अभियाना अंतर्गत शेतकरी कायदयांच्या संदर्भात विस्तृतपणे मांडणी करुन शेतकऱ्यांना कायदे समजावून सांगीतले.नविन कायदयांमुळे शेतकऱ्यांचे नेमके कसे नुकसान होणार आहे, या संदर्भात साधक-बाधक चर्चा शेतकऱ्यांसोबत करण्यात आली. जिल्हयातील १०५ गांवामध्ये अभियान राबवित असतांना शेतकऱ्यांनी उस्फूर्तपणे या कायदयांचा विरोध केला व यातुन हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.शेतकरी जागर मंचाने या संदर्भात जिल्हयातील १०५ गावातील शेतकऱ्यांना सोबत घेवुन १ जाने.२०२१ रोजी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय धरणे करणार आहे व तसे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

No comments
Post a Comment