Breaking News

1/breakingnews/recent

पोलिसांनी जर परवानगी नाकारली तर रस्त्यावर घेऊ: ३० जानेवारीला एल्गार परिषदचे आयोजन

No comments


मुंबई -

पाकिस्तान, राष्ट्रवाद, लव्ह जिहाद हे आमचे प्रश्न नाही मूलभूत गरजा साठी आहे. धर्म, जाती याऐवजी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांवर राजकारण फिरावे, या हेतूने आम्ही काम करत आहोत, हा संदेश देशभर जावा, या उद्देशाने एल्गार परिषद आयोजित केली होती. परंतु, ब्राम्हण्यवाद्यांनी या परिषदेला बदनाम केले. पण, आम्ही मागे हटणार नाही, येत्या ३० जानेवारी रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जर पोलिसांनी परवानगी नाकारली तर आता आम्ही रस्त्यावर ही परिषद घेऊ, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषदेचे पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आता एल्गार परिषदेच्या नव्या तारखेची पत्रकार परिषदेत घोषणा केली. कोळसे पाटील यांनी सांगितले की, पाकिस्तान, राष्ट्रवाद, लव्ह जिहाद हे आमचे प्रश्न नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांपासून ब्राम्हण्यवादी आणि भांडवलवादी आम्हाला दूर ठेवतात. हे सर्वदूर जावे. तसेच भीमा कोेरेगावच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजन केले होते. या परिषदेचा आणि नक्षलवाद्यांचा काही संबंध नसतानाही त्यांच्याशी संबंध जोडण्यात आला. मानवतावादी कार्य करणाऱ्या अनेकांना अटक केली. त्यातील सुधीर ढवळे, शोमा सेन वगळता कोणाचाही एल्गार परिषदेशी संबंध नव्हता. तसेच या परिषदेला नक्षलवाद्यांचा कोणताही पैसा लागला नव्हता. असे असताना वेगवेगळे आरोप करुन एल्गार परिषदेला बदनाम करण्यात आले.















No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *