Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

No comments

         News24सह्याद्री लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. वाहतूक शाखेने वर्षभरात केली दोन लाख 22 हजार 225 जणांवर कारवाई
 वर्षभरात दोन लाख 22 हजार 225 वाहनचालकांवर कारवाई करून पाच कोटी 67 लाख 51 हजार 767 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांवर करण्यात आल्या आहेत.

2. जाहिरातींचे फलक तुम्ही हटवता का आम्ही हटवू? - विद्यार्थी काँग्रेस
 विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी तसे निवेदन महापालिकेच्या उपायुक्तांना दिले आहे.  त्याचबरोबर पुतळ्याच्या डागडुजी बरोबरच परिसराचे सुशोभीकरण करून या स्थळाला गतवैभव मिळवून द्यावे. परिसराची स्वच्छता आणि पावित्र्य अबाधित राहील यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली

3. सीईओंच्या कार्यालयाबाहेर तरूणाचा मृत्यू
रुग्णवाहिका बोलून जिल्हा रुग्णालयात हलवले परंतु दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी दिली.

4. नववर्षाच स्वागत आणि शौर्य दिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा - पोलीस उपाधीक्षक 
नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव वर्षाचं स्वागत आणि शौर्य दिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शहराचे पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी केलं आहे. 

5. लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु 
जिल्हा परिषदेतील औषध कक्षात सुमारे ४० हजार ३२८ लिटर क्षमता असलेली शीत साखळी केंद्र उपलब्ध करण्यात आलेली आहेत. येणारी लस कोणत्या स्वरूपात असेल हे स्पष्ट नसले तरी त्याची साठवणूक करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *