सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नसेल: नसीम खान
मुंबई -
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील लोकांना फोडले जाते आहे असे नसीम खान म्हणाल्या काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे नसीम खान यांनी सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील लोकांना फोडले जाते. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे चालले पाहिजे. अन्यथा सरकार टिकवण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नसेल, असा इशारा काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिला.
काही दिवसांपूर्वी भिवंडी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. याविषयी नसीम खान यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. आमच्या पक्षातील लोकांना इतर पक्षात घेतले जाते. यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने असे वागू नये. काँग्रेसच्या लोकांना घ्यायचेच असेल तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांशी चर्चा केली पाहिजे. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही एकट्या काँग्रेसची नाही, असे नसीम खान यांनी सांगितले.

No comments
Post a Comment