Breaking News

1/breakingnews/recent

सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देण्यात येणार - राजेश टोपे

No comments


मुंबई -

सर्वात आधी लस डॉक्टर आणि पोलिसांना देणार जगभरात विविध कंपन्या कोरोनाची लस शोधथ आहेत. कोणती लस बाजारात आधी येणार? यासंबंधीही प्रश्न विचारले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.कुणी कितीही लॉबिंग केले तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले आहे.  महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे या यादीत नाव यावे म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असे सांगितले आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *