उदयनराजे भोसले यांची महाविकास आघाडीवर टीका
मुंबई -
उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहे अशी टीका भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. सातारा येथील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राची पाहणी करताना महाविकास आघाडीवर टीका केली आहे.केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीतले तीन पक्ष एकत्र आले आहे. केवळ सत्ता मिळवणे हाच त्यांच्या एकत्र येण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले आहे. लोकांची दिशाभूल करुन हे सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही. तसेच भाजपाची सत्ता लवकरच येणार असेही उदयनराजेंनी म्हटले आहे.

No comments
Post a Comment