शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का
मुंबई
सरनाईकांना आणखी एक धक्का प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. अशातच प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का बसणार आहे.
प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. सोमवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश पुर्वेश यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या पाठोपाठ पुर्वेश सरनाईक यांचीही चौकशी होणार आहे.

No comments
Post a Comment