राजेशाही सिंहासनावर बसायला दिला नकार: उद्धव ठाकरे
मुंबई
मुख्यमंत्र्यांनी स्टेटवर ठेवलेल्या राजेशाही सिंहासनावर बसण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधेपणा नेहमीच चर्चेत असतो. मग स्वतः गाडी चालवण असो की, इतर काही. इतकेच नाही, ते तात्काळ उचलायलाही लावले. हे बघून उपस्थित असलेले भारावून गेले. निमित्त होत औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे. उद्धव ठाकरे शनिवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहर पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन केले.
त्यानंतर ते जेव्हा व्यासपीठावर पोहोचले, तेव्हा त्यांना समोर राजेशाही सिंहासन दिसले. हे काय? म्हणत मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजेशाही सिंहासन उचलायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सूचना करताच व्यासपीठावर पटपट हालचाली झाल्या. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठावरून ती राजेशाही सिंहासन हटवले आणि त्या जागी इतरांसाठी असलेल्या खुर्चीपैकी एक खुर्ची आणून ठेवली. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा बघून मंत्र्यांसह उपस्थितही भारावून गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण मुख्यमंत्र्यांचे कौतूकही करत आहे.

No comments
Post a Comment