एकनाथ खडसे देणार भाजपाला पहिला झटका
मुंबई
भाजपातील राजकीय कारकीर्दीला पूर्णविराम देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले नेते एकनाथ खडसे हे भाजपाला पहिला झटका देणार असल्याची म्हणाले आहे त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. वाढदिवसाच्या पोस्टरमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात या चर्चेने जोर धरला आहे. भाजपाचे आमदार संजय सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याच बोलले जात होते. त्याची सुरूवात आमदार संजय सावकारे यांच्या प्रवेशाने होण्याची चिन्ह आहे.
आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावकारे यांच्या समर्थकांकडून भूसावळ शहरात शुभेच्छाचे फलक लावले. मात्र, भाजपा आमदार सावकारे यांच्या शुभेच्छांच्या फलकावरून पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे गायब झाल्याचे दिसले. नसोशल मीडियावरूनही आमदार सावकारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोशल मीडियावरील अनेक शुभेच्छा संदेशांवरही भाजपा नेत्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे छायाचित्र होते. शुभेच्छांच्या या फलकावरून भाजपा नेते गायब असल्यानं आता सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

No comments
Post a Comment