स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या: अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल महत्त्वाच विधान केले आहे.महाविकास आघाडीमुळे एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कायमचा घरोबा होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे.
महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या अशा स्पष्ट सूचना पवार यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदरांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. पराभूत झालेल्या उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील वजन मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागात पक्षाची काय स्थिती आहे यासह उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

No comments
Post a Comment