महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याप्रमाणे केंद्रात आघाडी: संजय राऊत
मुंबई
ज्याप्रकारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याच प्रकारे केंद्रात आघाडी होऊ शकते का? त्याच नेतृत्व कोण करणार? या सगळ्या मोठ्या गोष्टी आहे.एकत्र येऊन युपीएला मजबूत करावे लागेल असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यावरही निर्णय़ होतील शरद पवार युपीएचे अध्यक्ष होण्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनीही हे वृत्त नाकारले आहे.
शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रतिक्रिया आम्ही तर नेहमीच हितचिंतक राहिलो आहोत. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचं समर्थन करु असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments
Post a Comment