पार्थ पवारांविषयी मत मांडत रोहित पवार म्हणाले ....
मुंबई -
रोहित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटले आहे की, मी आज आमदार म्हणून आलेलो नाही. नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, मी पदाधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या होत्या. मात्र, अनेक कार्यकर्ते इथे आले, मी सांगितले मास्क लावा मात्र त्यांनी ऐकले नाही. मास्क लावा, स्वत: ची काळजी घ्या, असे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
याचदरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरला सेटल होणार आहेत, याबाबत रोहित पवार यांना प्रश्न केला असता पवार म्हटले आहे की , ते कोल्हापूरला जातील. पण कोल्हापुरकर त्यांच स्वागत करतात का हे बघू, असा टोला रोहित पवार यांना यावेळी लगावला आहे. तसेच, एकनाथ खडसे EDच्या चौकशीला समोरे जातील. राजकीय पद्धतीने जर अशा संस्थेचा वापर होत असेल तर ते अयोग्य असल्याचही रोहित पवार यावेळी म्हणाले आहे.

No comments
Post a Comment