सह्याद्री ब्रेकिंग - बोठे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बोठेच्या अडचणी वाढल्या
News24सह्याद्री -
यशस्विनी महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फरार असलेल्या बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी भर घालणारी बातमी आहे. जरे यांच्या हत्याकांडाचा बाळ बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले असून तो हत्याकांडानंतर फरार आहे. पोलीस त्याला शोधत असतानाच आज याच बोठेच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
बोठे हा रेखा जर यांचा खून झाल्या पासून फरार आहे पोलीस त्याच्या मागावर आहे मात्र नाशिक आणि पुणे या ठिकणी पोलिसांचा छापा पडण्याआधीच बोठे त्या ठीकाणावरून फरार झाला होता खुनाचा गुन्हा दखल झाल्या नंतर आता विनयभंगाचा गुन्हा दखल झाल्याने बोठे समोर अजून अडचणी निर्माण झाल्या आहेत.
घरी कोणी नसताना बोठे घरी यायचा आणि जबरदस्तीने मिठी मारून लज्जा उत्त्पन्न होईल अशा पद्धतीने शरीराला आणि अवयवाना हात लावायचा. तसेच बळजबरी करायचा, माझ्याशी शरीर संबंध ठेवले नाही तर तुझ्यासह कुटुंबाला संपवून टाकील अशी धमकी द्यायचा, अशी तक्रार सदर पीडित महिलेने केली असून यानुसार बाळ बोठे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे,
No comments
Post a Comment