सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - जागतिक एड्स दिन
News24सह्याद्री -
या संशोधनात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचं आलं. विशेष म्हणजे एड्सची निर्मिती झाल्यानंतर ३० वर्षांनी या रोगाची माहिती झाली. तसेच एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस म्हणजेच सतत रचना बदलणारे विषाणू हे आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १ पूर्णांक ६० कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते. असेही नवीन अभ्यासात निष्पन्न झाले. अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत रचना सतत बदलणाऱ्या लेंटिव्हायरसेस या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार एचआय़व्हीचा हा चिंपांजीचा वायरसचं परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी वायरसच्या नावाने ओळखला जातो.
किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा वायरस मनुष्याच्य़ा शरीरात आला असण्याची शक्यता वर्तवली गेली.आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम मद्रासमध्ये 1986 साली पहिला HIV बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर HIV बद्दल अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पथनाट्य , गावागावात फेऱ्या काढल्या जातात. डॉक्टर्सचे व्याख्यनांच आयोजन केलं जात. तसेच या दिवशी एड्सग्रस्त रुग्णांचा सन्मान देखील केला जातो.
No comments
Post a Comment