मोठी बातमी - एलसीबीच्या प्रभारी पदी अनिल कटके यांची नियुक्ती
News24सह्याद्री -
नगर जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी अनिल कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे , पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते ,एलसीबीतील नियुक्तीसाठी अनेकांनी फिल्डिंगहि लावली होती , त्यामुळे या पदी नेमकी कुणाची वर्दी लागते याबाबत बरीच चारचा होती , अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कटके यांच्याकडे एलसीबीचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल कटके हे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी होते. दरम्यान आता त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचा चार्ज देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जारी करत हा नियुक्तीचा विषय अगदीच संयमाने हातल्याच दिसतंय , त्यामुळे आता कटके यांच्याकडून चांगल्या मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे तर कटके हे अधीक्षकांच्या विश्वासास पात्र ठरणार का हे पाहून महत्वाचं ठरेल ..̣
No comments
Post a Comment