दिल्ली व मुंबई मध्ये कोरोनाची दुसरी लाट : विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करणार बंद..
मुंबई
मुंबईसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्याने पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.
दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.

No comments
Post a Comment