सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - वर्ल्ड टेलिव्हिजन डे..
News24सह्याद्री -
आज 21 नोव्हेंबर, या दिवशी जगभरात ‘जागतिक दूरदर्शन दिन’ साजरा केला जातो. दूरदर्शन, हे एक प्रसार माध्यम आहे जे मनोरंजन, शिक्षण, बातम्या, राजकारण, गप्पाटप्पा इत्यादी प्रदान करते. आज घराघरात दूरदर्शन संच आहेत. एका अभ्यासानुसार, 2023 सालापर्यंत जागतिक पातळीवर कुटुंबांकडे एकूण 1.74 अब्जांहून दूरदर्शन संच असतील.असा अंदाज वर्तवला गेला आहे. दूरदर्शन च्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगानं बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवत आहोत.
या दिनाच्या इतिहासाबाबत बोलायचे झाले तर दिनांक 21 आणि 22 नोव्हेंबर 1996 रोजी अमेरिका या देशाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला. लोकांना माहिती पुरवण्यामध्ये दूरदर्शन संचाचे महत्व आणि बदलत्या जगात त्याची नक्की काय भूमिका असेल यावर या सभेत चर्चा झाली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी दिनांक 17 डिसेंबर 1996 रोजी ठराव मंजूर करीत, 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली.सध्या च्या काळात टी.व्ही. कुटुंबाचा घटक बनून गेला आहे. दूरदर्शनमुळे वाचनसंस्कृती लयास गेली असा दोषारोप केला जातो. प्रारंभीचा टेलिव्हिजनचा अवतार हा यांत्रिक स्वरुपाचा होता व तो सेलेनियम या धातूच्या फोटो कंडक्टिव्हिटी तत्त्वावर आधारीत होता. विलो- - स्मिथ नावाच्या तंत्रज्ञाने १८७३ साली तो शोधून काढला होता. १८८४ मध्ये जर्मनीतील पॉल गॉटलिब निपकोन याने स्कॅनिंग डिस्क शोधून काढली व त्या मॉडेलमध्ये सुधारणा केली होती.
मात्र १९२५ च्या सुमारास जॉन लॉगी बेअर्ड याने या यांत्रिक खोक्यात फिरत्या प्रतिमा दाखविल्या व तोच तो खरा टेलिव्हिजन ठरला. अर्थात त्यात इलेक्ट्रोनिक्स क्रांतीनुसार उत्क्रांती होत गेली हेही तितकेच खरे आहे.टेलिव्हिजनचा शोध लागल्यापासून तो घरेदारे, कार्यालये, सार्वजनिक संस्था या ठिकाणी आपले स्थान हक्काने पटकावून बसला आहे. अलिकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा क्लोज सर्किट टेलिव्हिजन हा अवतारदेखील सार्वजनिक ठिकाणी, उद्योगक्षेत्रात, मॉलमध्ये सर्रासपणे वापरला जात आहे. अश्या या आपल्या घरातील इडियट बॉक्स चा हा जागितक दिवस आहे.
No comments
Post a Comment