Breaking News

1/breakingnews/recent

ठाकरे सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे दुर्लक्ष : देवेंद्र फडणवीस

No comments

 News24सह्याद्री -


मुंबई -

 विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी औरंगाबादमध्ये आले होते,  त्यावेळी ते बोलत असताना म्हटले की, 'ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

पुढे म्हणाले की, 'मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मत घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही'. 'केंद्राच्या निधीतून आम्ही विकास केला, मराठवाड्याशी संबंधित दोन योजना दिल्या आहे. यात मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजनाही होती. पण या योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. ते काम ठप्प आहे. समुद्रात वाहून जाणार पाणी गोदावरी बकेटमध्ये आणण्यासाठी योजना केली, निधीची तरतूद केली, पण तेही काम बंद पडलेले आहे' असे फडणवीस म्हणाले आहे.

तसेच, 'मराठवाड्यातील दुष्काळामुळे शेतकरी आणि इंडस्ट्रीवर परिणाम होतो. सह्याद्रीचे पाणी आणले तर दुष्काळ संपू शकतो. औरंगाबादसाठी 1680 कोटी आम्ही पाण्यासाठी दिले आहे. शहरातील रस्त्यांसाठी खूप निधी दिलाअसून, आता रस्ते तयार झाले आहे. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे' असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.'या सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा नाहीच. मराठवाडा आणि विदर्भाला पैसे देण्याचे राज्यपालांचे बंधन या सरकारने संपवले आहे. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल' अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत. 'पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार पदवीधरांचे प्रश्न मांडण्याऐवजी मुंबईच्या एसआरएचे प्रश्न मांडताना दिसतात' असा घणाघातही फडणवीसांनी केला आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *