चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणे झेपलले नाही : संजय राऊत
News24सह्याद्री -
मुंबई -
चंद्रकांत पाटलांनी शरद पवार हे छोटे नेते आहेत अशी टीका केल्यानंतर त्यांना रोषाला सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणे झेपलेले नाही.शरद पवार छोटे नेते असतील तर मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?', असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच, 'शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोलले म्हणून कमी होत नाही', असे संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणे झेपलेले नाही. इतक्या छोट्या नेत्याला मोदी यांच्या सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिला आहे. सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रालीत महान योगदानासाठी हा पुरस्कार दिला आहे. हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नसावे. माहिती नसेल तर पीएम ओकडून माहिती घ्यावी. याच छोट्या नेत्याचा अनेक वर्ष नरेंद्र मोदी सल्ला घेऊन गुजरात आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत. बहुदा चंद्रकांत पाटील आणि भाजपामध्ये वैचारिक दरी निर्माण झाली आहे. किंवा मोदी सांगत आहेत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाही. किंवा मोदींना हे जुमानत नाही असे दिसत आहे. तुम्ही राजकारण करा पण वैयक्तिक स्तरावर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्ल इतक्या खालय्चा स्तरावर येऊन बोलू नका'. असे राऊत म्हटले आहे.

No comments
Post a Comment