Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी : हसन मुश्रीफ

No comments

  News24सह्याद्री -



मुंबई - 

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक टीका केली होती. त्या टीकेवरुन मुश्रीफ यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत म्हटले आहे की, 'भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्णासारखी झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील ते असे वक्तव्य करत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत,' अशी घणाघाती टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

तसेच, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला आहे. त्यांनी लोकसभेच्या 10 ते 12, विधानसभेच्या 10 ते 12, निवडणुका जिंकल्या आहेत. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. ते किती भाग्यवान आहेत. पण या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *