सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे : संजय राऊत
News24सह्याद्री -
मुंबई-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाचने इडीने केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर या कारवाईविरोधात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

No comments
Post a Comment