Breaking News

1/breakingnews/recent

बावनकुळेंची वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू राज्य सरकारवर सडकून टीका

No comments

  News24सह्याद्री - 


मुंबई -

माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. वीजबिल माफीसाठी ५ हजार कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवालच बावनकुळे यांनी केला आहे.

तसेच वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोट बोलत आहे. सरकारने १०० युनिट वीज माफीच आश्वासन दिले होत. दिलेले आश्वासन या सरकारने पाळले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचे नाव खराब करण्याच काम हे सरकार करत आहे. या सरकारमध्ये वाद आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. 

बावनकुळे यांनीपुढे म्हटले की, सरकारच्या काळात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. नागपूर, भंडारा आणि यवतमाळवरून रेट ठरवून दारूची तस्करी वाढली आहे. सरकारच्या काळातील या धंद्यावर प्रकाश टाकला तर बिघडले कुठे?, असे सांगतानाच सरकार तुमचेच आहे. माझी खुशाल चौकशी करा, असे आव्हानच बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता दिले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *