मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न ; संजय राऊत
News24सह्याद्री -
मुंबई -
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजप वर वक्तव्य करत असताना म्हटले आहे की, “भाजपा एक राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना मुंबईत, मुंबईच्या उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली, जमिनींमध्ये रस असल्यामुळे त्यांना मुंबई महापालिकेत रस आहे. हे गेले पन्नास वर्षे सुरू आहे. त्यांना मुंबईला दिल्लीचे गुलाम, पायपुसणे करायचे आहे. आम्ही ते होऊ देत नाही. त्यांना मुंबई विकून घशात घालायची आहे. मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध आहे. कोणाच्या शंभर पिढ्या जरी आल्या तरी मुंबई महानगरपालिकेवर आज जो भगवा फडतोय त्याला हात लावण्याची, तो खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हाच जळून खाक होतील,” असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असा निर्धार माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला होता.
“त्या भगव्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचा त्याग, रक्त सांडले आहे,” “फडणवीस हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधान करू शकतात. जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही, असे भाजपाला वाटत असेल आणि जे कोणी भगवा फडकवणार आहेत तो शुद्ध आहे हे जनताच ठरवेल. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा असून गेली ५० वर्षे तो मुंबई महानगरपालिकेवर फडकत आहे,” असे राऊत म्हणाले आहे.
तसेच याच दरम्यान राऊत म्हणाले की, भाजपा मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईला वेगळ करण्याचे भाजपाच राजकारण आहे. कोणी नटी मुंबईला पीओके म्हणाली, मुंबई पोलिसांना माफीया म्हणाली. ती भाजपाची कार्यकर्ती आहे. तिच्या समर्थनार्थ असणाऱ्यांना मुंबई देणार का असा सवालही राऊतांनी केला आहे. “राजकारणात सर्वांकडूनच इशारे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे प्रत्येक भाषणात इशारे देत असतात. एखादी गोष्ट चुकीची होत असल्यास इशारा दिला जातो. तुमच्या पक्षाचे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खोटेनाटे आरोप करत असतील आमच्या पक्षातील नेते इशाराच देणार. ही लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आहे,” असे राऊत म्हणाले आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane

No comments
Post a Comment