Breaking News

1/breakingnews/recent

CBI च्या तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

No comments

   News24सह्याद्री - 


नवी दिल्ली - 


केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकार क्षेत्राबाबत अनेकदा राज्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह काही राज्यांनी सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी घेणे बंधनकारक केले होते.परंतु याच दरम्यान आता, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मोठा निर्णय दिला असून आता सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी घेणे बंधनकारक असणार असल्याचे सांगितले आहे.

एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायलयाने म्हटलेआहे, की ही तरतूद घटनेच्या संघराज्य या वर्णनाशी संबंधित आहे. तसेच दिल्लीतील विशेष पोलीस स्थापना अधिनियमात अधिकार क्षेत्रासाठी सीबीआयसाठी राज्य सरकारची परवागी घेणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सीबीआयचे संचालन दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा १९४६ च्या माध्यमातून होत आहे. तसेच सीबीआयला तपासापूर्वी संबंधित राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यात सांगण्यात आले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *