Breaking News

1/breakingnews/recent

महाविकास आघाडी सरकार बैलासारखे, टोचल्याशिवाय पुढेच जात नाही : नितीन गडकरी

No comments

 News24सह्याद्री -



मुंबई - 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते की, 'महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच नाही,' असा टोला लगावला आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचे गडकरी म्हणाले आहे. 'नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागले आहे. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात झाले असते,' असे गडकरींनी म्हटले आहे. 

निवडणुकीत जातीपातीचे राडकारण व्हायला नको,  'माणूस जातीने मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये जातीनिहाय आघाड्या आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचे राजकारण करत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा,' असे मत गडकरी यांनी मांडले आहे.

याच दरम्यान ,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत म्हटले आहे की,  विश्वासघात करत राज्यात ३ पक्षांचे सरकार आले आहे. पण आज सरकारमधील एकही मंत्री वर्षभरातले आपलं काम सांगू शकलेला नाही, शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचं वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता याव यासाठी योजना आणली. मात्र हे सरकार काय करतेय माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले आहे. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असे ही फडणवीस म्हणाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *