तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती : संजय राऊत
News24सह्याद्री -
मुंबई -
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावत प्रतिक्रया देत म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून नियुक्ती केली आहे,' असे ते म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी म्हटले की , संजय राऊतांचे नाव घेतले की कानाला त्रास होतो, अशी टीका पाटील यांनी केली होती. संजय राऊत यांनी त्याला उत्तर देताना म्हटले आहे की, चांगली गोष्ट आहे. आमचे नाव घेतले की कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नेमणूक केली आहे. तसेच, तुमचा जो शेतकरी अन्नदाता आहे, तुम्ही त्याला दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. महाराष्ट्राप्रमाणे पंजाब, हरियाणामधील शेतकरी आहे. ज्यांनी हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
याचदरम्यान, राऊत म्हटले की, बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नुकतेच अशी माहिती त्यांनी दिली आहे. लवकरच उर्मिला मातोंडकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असेही म्हटले जात आहे. त्यानंतर उद्या पत्रकार परिषद घेत उर्मिला शिवसेना प्रवेशाबाबत अधिकृतरित्या माहिती देतील, असे सांगितले जात आहे. 'उर्मिला या शिवसेनेतच आहेत. त्या बहुतेक उद्या प्रवेश करतील, असे वाटते आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामुळे आमची महिला आघाडी मजबूत होईल,' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

No comments
Post a Comment