Breaking News

1/breakingnews/recent

प्रताप सरनाईक यांना प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील - किरीट सोमय्या

No comments


मुंबई 

प्रश्नांची उत्तरे प्रताप सरनाईक यांना द्यावीच लागतील असे किरीट सोमय्या म्हणाले शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झाले. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये ईडीचे पथकाने शोधमोहिम हाती घेतली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीच पथक पोहोचले आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर विदेशातून परतलेल्या प्रताप सरनाईक यांनी, ‘फाशी दिलीत तरी चालेल पण तोंड बंद करणार नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यापुढे काही सवाल उपस्थित केले आहे.

ठाकरे सरकारमधील नेतेमंडळी राजकीय दवाब आणून घोटाळे लवपण्याचा प्रयत्न करत आहेत का? तुमची संपत्ती विदेशात कशी काय? घोटाळेबाजांशी तुमचे संबंध काय? तुमच्याकडे बेनामी संपत्ती किंवा तुमचं बेनामी उत्पन्न आहे का? या महत्त्वाच्या प्रश्नांची प्रताप सरनाईक यांना उत्तरे द्यावीच लागतील, असे किरीट सोमय्या ट्विटरवरील व्हिडीओच्या माध्यमातून म्हणाले. तसेच, कोणताही नेता किंवा वैयक्तिक व्यक्ती हा कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे ईडीच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी लागतील, असेही सोमय्या म्हणाले

दरम्यान, काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रताप सरनाईक यांच्यासंदर्भात भाजपावर केल्या जाणाऱ्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिले. “सक्तवसुली संचालनालयाची कारवाई हा त्या खात्याचा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. त्या खात्याने कोणत्या ठिकाणी कोणती कामे करावीत हा त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. पण काहीही झाले की भाजपच्या नावाने टीका करणे हे आता केंद्रातील विरोधकांचे कामच बनले आहे”, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *