Breaking News

1/breakingnews/recent

भारताने ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे चीनकडून गंभीर आरोप

No comments




दिल्ली 

भारताकडून घेण्यात आलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या निर्णयाचा चीनने विरोध केला आहे. भारताकडून अजून ४३ अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन संतापला आहे. भारत वारंवार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली अ‍ॅप्सवर बंदी घालत असल्याचा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला आहे. मंगळवारी इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ४३ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.आशा आहे की भारत बाजारपेठेत सर्वांना निष्पक्ष, निःपक्षपाती आणि भेदभाव नसलेला व्यवसाय करु देईल आणि भेदभाव करणार नाही.

जी रोंग यांनी यावेळी भारताने केलेली अ‍ॅप्सबंदी हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला आहे. चीन आणि भारत धोक्यांऐवजी एकमेकांना विकासाच्या संधी आहेत. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारिक संबंध योग्य मार्गावर आणले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.सरकारने म्हटले आहे की, “नागरिकांचं हित व देशाचे सार्वभौमत्व लक्षात घेऊन या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे”.

बंदी घालण्यात आलेली अ‍ॅप्स ,अली सप्लायर्स मोबाइल अ‍ॅप, अलीबाबा वर्कबेंच. अलीएक्स्प्रेस स्मार्टर शॉपिंग, बेटर लिव्हिंग, अलीपे कॅशीयर, लालामुव्ह इंडिया डिलीव्हरी अ‍ॅप, ड्राइव्ह विथ लालामुव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड- बिझीनेस कार्ड रिडर, कॅमकार्ड बीसीआर (वेस्टर्न), सोल- फॉलो दी सोल टु फाइंड यू, चायनीज सोशल डेटिंग अ‍ॅप, वुईडेट, सिंगॉल डेटिंग अ‍ॅप, अ‍ॅडोर अ‍ॅप, ट्रली चायनीज, ट्रली आशियन, चायना लव्ह, डेट माय एज, आशियन डेट, फ्लर्टविश, गाइज ओन्ली डेटिंग, टय़ुबिट, वुई वर्क चायना, फर्स्ट लव्ह लाइव्ह, रेला, कॅशियर वॉलेट, मँगो टीव्ही, एमजी टीव्ही. वुई टीव्ही,वुई टीव्ही सीड्रामा, व्हीटीव्ही लाइट, लकी लाइव्ह, टाओबाओ लाइव्ह, डिंग टॉक, आयडेंटिटी व्ही, आयसोलँड २, बॉक्स स्टार, हिरोज इव्हाल्व्हड, हॅपी फिश, जेलीपॉप मॅच, म्युककिन वॉच. कॉन्क्विस्टा ऑनलाइन २ यांचा समावेश आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *