ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह : ग्राहकांचा शोध सुरू
दिल्ली
इंदूर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामधील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सणासुदीच्या कालावधीमध्ये या ज्वेलर्सच्या दुकानामधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेण्याचे काम कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केले आहे.
“करोनाचा संसर्ग झालेल्या दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली आहे. मागील आठवड्याभरात या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आम्ही घेत आहेत. या लोकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी काही लक्षण दिसत असतील तर त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे,” अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. प्रविण जाडिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दुकान बंद करण्यात आले असून ते वेळोवेळी सॅनिटाइज करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुकान पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

No comments
Post a Comment