Breaking News

1/breakingnews/recent

सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला टोला

No comments


मुंबई 

लोक सारखे म्हणतात की हे सरकार पडणार आहे हे ऐकताना मला गमंत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेल भांड कधी आवाज करत नाही  त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा सरकार पडले तर बघू काय करायच ते हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहेअसा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेल नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही,” असेही त्या म्हणाल्या आहेत. इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केले. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल. “देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपले पुणे हवेहवेसे  वाटतय,” असा टोला त्यांनी लगावला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *