Breaking News

1/breakingnews/recent

शरद पवारांना छोटे नेते म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

No comments


मुंबई 

राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहे त्यांचा अभ्यास नसतो अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना छोटे नेते म्हटल्यानंतर चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान वाद निर्माण झाला होता. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले असून ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हते, तर सर्वांबद्दल होते असे म्हटले आहे. तसेच आपण शरद पवारांवर पीएचडी करत असल्याचं ते म्हणाले आहेत. शरद पवारांचे स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचे कौशल्य खरोखर मोठे आहे असे म्हणत त्यांनी कौतुक केल 

“शेती, साखर या गोष्टीत शरद पवारांचा आहे तितका अभ्यास कुणाचा नाही. शरद पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले,” असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही. मंत्रालय कुठे आहे, हेदेखील त्यांना माहिती नव्हते. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी आमदार, नगरसेवक होते. मीदेखील रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी अभ्यास केला. उद्दव ठाकरेंना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीतचंद्रकांत पाटील यांनी यावेळी ईडी चौकशीवरुन होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले “ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉण्ड्रिंगची चौकशी करते. तुम्हाला माणस टिकवता येत नाहीत, हे मान्य करावं,” असं त्यांनी म्हटले. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *