‘नाचता येईना अंगण वाकडे’ नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे या सरकारने ६५ हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढून ठेवले आणि राज्य दिवाळखेरीत नेलं असाही आरोप नारायण राणे यांनी केला. हात धुवून मागे लागेन अशी धमकी त्यांनी दिली आहे ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावे असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. माझा महाराष्ट्र माझ व्हिजन या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल आहे. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हे महाराष्ट्राच दुर्दैव आहे असही नारायण राणे यांनी म्हटले आहे.हे सरकार तीन पक्षांचं सरकार आहे.
जनतेशी गद्दारी करुन आलेल हे सरकार आहे हे सरकार फार काळ टीकणार नाही असेही नारायण राणेंनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही नारायण राणेंनी भाष्य केल आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिलेल नाही. सुप्रीम कोर्टात चांगले वकील नेमण्याची गरज आहे मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचे संजय राऊत कौतुक करत आहेत. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. महाराष्ट्रात हे जे तीन पक्षांचं सरकार आहे ते सरकार महाराष्ट्र हिताचं नाही त्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नाही

No comments
Post a Comment