शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत उल्लेख केल्या नंतर रावसाहेब दानवेंनी दिले उत्तर
मुंबई
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्योतिषी म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाच सरकार येईल असा दावा केला आहे. यासंबंधी शरद पवारांना विचारले असता त्यांनी दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहे हे माहिती नव्हते असा टोला लगावला आहे.
ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे.मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही राज्यात भाजपाच सरकार येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसे येईल याचे नियोजन कसं सांगू?.
रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळाले असा टोला शरद पवारांनी लगावला होता.

No comments
Post a Comment