अजित पवारांनी मान्य केली चूक
मुंबई
आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याचे अजित पवारांनी मान्य केले.पंढरपूर नगरपालिकेसाठी शासनाकडून जाहीर करूनही थकलेल्या यात्रा अनुदानाबाबतचे वृत्त माध्यम मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत हा निधी तातडीने जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून यानंतर लगोलग हा निधी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाल्याची माहिती पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली. कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपुरात आलेल्या अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना चूक झाल्याचे मान्य केले असून.अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी यावेळी आपण अनुदानाचे पैसे जमा झाल्याची ऑर्डर घेऊन आल्याची माहिती दिली ते म्हणाले की “मागे राज्याचे प्रमुख आले तेव्हा पंढरपूरसाठी पाच कोटींचा चेक दिला होता. पण ते पैसे जमा झाले नव्हते. ही आमची चूक आहे असे मान्य केले जेव्हा आपण चेक देतो तेव्हा पैसे जमा झाले पाहिजे. त्यामुळे कालच ऑर्डर काढून, ते पैसे जमा करुन जायचे असे अर्थमंत्री या नात्याने मी ठरवले होते. नगराध्यक्षांकडे ती ऑर्डर सुपूर्त केली आहे”.अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असे ते म्हणाले. “गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला आहे ,” असे अजित पवारांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचेही आवाहन केले.
यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचे सांगितले.“अवघ्या जगासमोर कोरोनाच आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेच आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे.

No comments
Post a Comment