अतुल भातखळकर यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली असता,या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असे नाव देण्यात आले ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे.“मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीच्या प्रोमोमधील भाषा ही केवळ दुर्देवी नसून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दात पाडणे, सुडाच राजकारण, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातील आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून बोलतायत अशा प्रकारची स्थिती आहे. मी त्यांना एवढंच सांगेन बायका मुले आम्हालाही आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरू असे होत नाही,” असे भातखळकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, करोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी भाजपाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नये एवढंच सागत असल्याचंही त्यांनी नमूद केल.
संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिष आणि भाकितं वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेल दिसत असून असे बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायच असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यासंबंधीबीही संजय राऊत यांनी विचारणा केलेली दिसत आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”. “विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळलं तेव्हा मला स्फुर्ती येते. आडव येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असेही ते म्हणाल्याच प्रोमोमध्ये दिसत आहे.

No comments
Post a Comment