उदयनराजेंचं राज्य सरकारला आव्हान : फडणवीसांच्या हातात सत्ता द्या
मुंबई -
उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आऱक्षणासाठी काम केले तरी आपण त्यांनाच नावे ठेवतो आहे. आता तुम्ही सत्तेत आहात तर त्यांचं काम पुढे न्यावे. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन,उदयनराजें म्हणाले. निवडणुका येतात त्यात तु्म्ही नुसती आश्वासने देता आणि फक्त दुसऱ्यांना नावे ठेवता. थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. जातीचे राजकारण करायच असेल तर घरी बसा. प्रश्नांवर राजकारण करणार आहात की नाही. आज तुम्ही देवेंद्र फडणवीस जे आपल्याच पिढीतले आहे त्यांनी मराठा आऱक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर तुम्ही सत्तेत आला तर त्यांचे काम पुढे न्या. उलट तुम्ही काहीतरी कारण सांगून अजूनही प्रश्न प्रलंबित ठेवत आहे.कोरोनाचा काळ आहे म्हणून लोक घरात शांत आहे.
मराठा समाजावर अन्याय होत गेला आहे आणि तुम्ही त्यांना दाबत गेलात तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होईल. क्रियेला प्रतिक्रिया होऊ शकते. याला कोण थांबवणार? जर उद्रेक झालाच तर त्याला जबाबदार कोण आहे? कशाचेही नुकसान झाले तर त्याला हीच लोक जबाबदार असतीलअसे ते म्हणाले अशा शब्दांत उदयनराजेंनी दिला सरकारला इशारा. मराठा स्ट्राँग मॅन आहे तर ही उपमा कितपत लागू होते. तुम्ही मोठे लोक आहात तुमच्याकडे समाजाने इतर काहीही मागने मागितलेले नाही. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला निवडून दिले आहे म्हणून तुम्ही मोठे आहात. कोण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. पण तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यांनी तुम्हाला मान दिला त्यांचा जर विश्वासघात झाला तर हीच लोकं तुम्हाला पुन्हा खाली खेचतील, असा इशाराही यावेळी उदयनराजेंनी सत्तेतील सर्व मराठा नेत्यांना दिला आहे.

No comments
Post a Comment