Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - देशातील शेतकरी हे पाकिस्तानी नाही; मत मागायला जाता मग चर्चा करा अण्णा हजारेंची केंद्र सरकारवर टीका

No comments

   News24सह्याद्री -




कृषी कायद्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दीला आहे, तर शेतकऱ्यांना  केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर अण्णा हजारेंनीं केंद्र सरकारवर टीका केली आहे.अण्णा हजारेंनीं शेतकरी आंदोलना बाबत भूमिका मांडताना सांगितले की आंदोलन करणारा शेतकरी हा पाकिस्तानी नाही त्यामुळे कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी वागणूक हि चुकीची आहे, निवडणूका आल्या की शेतकऱ्यांच्या शेतात त्यांच्या घरात मत मागायला जाता मग त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाही. दिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फव्वारे उडवले जात आहे त्यात एक शेतकरी शहीदहि झाला आहे. असं असलं तरी आज शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे उद्या जर हिंसा भडकलि तर त्याला जबाबदार कोण  असा सवाल देखील अण्णा हजारें यांनी उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे ,यासंदर्भातील अण्णांची भूमिका पाहुयात शेतकरी आंदोलन पेटलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर निशाणा साधलयच आपण पाहिलं ,मात्र यापुढे जाऊन अण्णा काय भूमिका घेणार या कडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *