Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - भाजपचं प्रशिक्षण शिबीर गुंडागर्दीचे की अभ्यासाचे ?

No comments

  News24सह्याद्री -





सध्या भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत , मात्र अश्यातच आता पक्षांतर्गत वाद उफाळून येताना दिसताहेत .नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात सुरू असलेल्या भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेतआज भाजप कार्यकर्त्यां मध्ये चांगलीच जुंपल्याच पाहायला मिळाले. कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाल्याचं समजतंय. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्यात चांगलाच वाद पेटला! प्रकरण हातघाईवर आल्यानंतर ज्येष्ठांनी मध्यस्थी केली आणि वादावर पडदा पडला! मात्र, त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झडली!नगर शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील चारही मंडलातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोरोनाच्या भितीने केवळ शंभरच्या आसपास कार्यकर्त्यांनी शिबिराला हजेरी लावली.

 तर ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी संधी दिली जाणार आहे की नाही? असा सवाल मुकुंद देवगावकर यांनी केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बोलण्यासाठी संधी दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र वेळेवरून चांगलीच खडाजंगी झाली. आम्ही कोरोनाच्या काळात खूप काम केले, पक्षाने काय काम केले, ते आधी सांगावे, असा प्रश्न देवगावकर यांनी उपस्थित करत पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक शिरल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर देवगावकर यांच्यावर अनेक पदाधिकारी तुटून पडले. त्यामध्ये कुलकर्णी-देवगावकर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद मिटला आणि प्रशिक्षण सरू झाले .देवगावकर यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना बैठकीसाठी निमंत्रण देखील नव्हते! त्यांनी बैठकीत येण्याचा प्रश्‍नच नाही! पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना ते कधीच नसतात आणि असे असताना आम्हाला उपदेश करण्याचा त्यांना कोणता अधिकार असा थेट प्रश्‍न नरेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय!नरेंद्र कुलकर्णी यांची बाजू समजून घेतल्यानंतर यांच्याशी संपर्क केला. 

काय म्हणालेत देवगावकर पाहू यातदेवगावकर यांनी अत्यंत स्फोटक असा खुलासा केला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून ते सदस्य असल्याचा त्यांचा दावा आहे. पक्षात गुंडगिरी, सरकारी जागा हडप करणार्‍यांना पदे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय! या अनुषंगाने भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. भाजपा शहर जिल्हाध्यक्षांनी सांगितले आहे की, या दोघांच्या भांडणाचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही. तो त्यांचा व्यक्तीगत विषय आहे.राज्यात भाजपाची सत्ता नसल्याने सत्तेवर असणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्याचा अजेंडा भाजपाने हाती घेतला आहे. त्यासाठी  भाजपाने बैठका , प्रशिक्षण शिबीर आणि पत्रकार परिषदांचे सत्र सुरु केले आहे, नगरमध्ये अशी बैठक सुरू असतानाच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर्गत वाद उफाळून आला. त्यामुळेआता नव्याने समोर आलेला हा वाद एवढ्यावरच थांबणार कि विकोपाला जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्यात.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *