संजय राऊतांच्या आव्हानाला किरीट सोमय्या यांचे उत्तर..
News24सह्याद्री -
मुंबई उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले आहे. यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत ठाकरे सरकारने जमीन व्यवहार केल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना वॉर्निंग दिली. यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यावर उत्तर देण्याची शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांमध्ये हिंमत नसल्याचे म्हटले आहे.“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहे.
“पुराव्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचे आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणून शिवीगाळ करता. दहिसर घोटाळ्याची सगळी कागदपत्रे असून मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ती दाखलही झाली आहे,”“ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावे. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचे नाही,” असे किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटले आहे. “मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहे. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहे,” “मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचे तरी उत्तर द्या.
महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे.अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन संजय राऊत तुमची महापालिका ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका,” असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिले आहे.४० पैकी ३० जमीन व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत का आहेत याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. ऱश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावे. आर्थिक व्यवहार करत आहेत याशिवाय मी काही आरोप केलेले नाही. मी फक्त खुलासा मागितला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रे चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा,” “उत्तरं देता येत नाहीत म्हणून शिव्या द्यायला निघाले आहेत ही तुमची संस्कृती आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जमीन खाल्ली. म्हाडाने नोटीस दिली आहे. मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.
“सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रे पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.“पाच हजार बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलच्या नावानेही घोटाळा झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कानात सांगितल्याचे महापौरांचे लेखी म्हणणे आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा प्रोजेक्ट घेऊन पालिका धावत सुटली. तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारच्या कौटुंबिक मित्र बिल्डरकडून घेण्याचा घोटाळा पूर्ण केला. ही तक्रार राज्यपालांकडे दिली होती. राज्यपालांनी त्यांच्याकडील अधिकारांतर्गत लोकायुक्तांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत,” “दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारविरोधातील तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार असे महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासन दिले होते. हे वचन मी पाळले आहे. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार. मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,
No comments
Post a Comment