सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
News24सह्याद्री -
आष्टी तालुक्यातील नागरीकांनवर बिबट्याचे हल्ले सुरूच आसुन आज पुन्हा एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. पारगाव येथील शालन भोसले या महिला शेतातील गवत घेऊन येत आसताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हि महीला गंभीर जखमी झाली प्रार्थमिक उपचारासाठी या महिलेला आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात हि महिला गंभीर जखमी झाल्याचं समजतंय.दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याबाबतच्या अशा घटना सातत्याने समोर येता हेत.
त्यामुळे आता नागरिकांमध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालीये,आष्टी तालुक्यातील नागरिकांना या बिबट्याच्या भीतीपोटी घराबाहेर पडण्याचहि कठीण झालं आहे, त्यामुळे वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, मात्र हा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकू पर्यंत किती जणांचे बळी घेणार असा प्रश्नहि या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
No comments
Post a Comment