Breaking News

1/breakingnews/recent

अजित पवार धुतल्या तांदळासारखे नाही : भाजपा नेत्याचा निशाणा

No comments

मुंबई -

 भाजपा नेते निलेश राणे यांनी साधला निशाणा गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम केला. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या नेहरु सेंटरमधील त्या बैठकीतील चर्चेनंतर अजित पवार यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.अजित दादा पवार आता बोला, इतके दिवस जे काही लोकांना वाटत होत की तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केले.  

नेहरु सेंटरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते.पण यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले ही चर्चा सर्वस्वी चूक आहे. दिल्ली मध्ये पवार आणि माझ्यात उत्तम संवाद होत होता. रोजच आम्ही भेटत होतो भाजपाशी डील करण्याच्या ते मनस्थितीत नव्हते. पण भाजपाकडून ऑफर्स येत असल्याचे ते सांगत होते. लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले होते. याच काळात शेतकरी प्रश्नांसंदर्भात पवारांनी मोदींची भेट घेतली आणि राज्यातील सत्तेबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यामुळे शरद पवारांनी भाजपाला शब्द दिला होता त्यामुळेच पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटे आहे असं ते म्हणत होते. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *